तुमचा एसी विजेची बचत करतो का ?

Spread the love

डिजिटल डेस्क : वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. यामुळे कित्येकांनी एसी वापरण्यास सुरुवात केली आहे. एसीच्या किंमती कमी झाल्यामुळे घरा-घरांमध्ये एसी दिसू लागला आहे. मात्र, अजूनही कित्येक लोक एसीमुळे जास्त लाईट बिल येतं म्हणून एसीचा वापर टाळतात.

एसीचं तापमान योग्य प्रकारे मॅनेज केल्यास तुम्ही लाईट बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत करू शकता. कित्येक वर्षांपासून एसी वापरत असणाऱ्या लोकांनाही याबाबत माहिती नसते. कितीतरी लोक एसी 18 किंवा 21 डिग्री सेल्सिअसवर ठेवतात, आणि रुम थंड झाली की तो बंद करतात. मात्र, यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने एसी वापरल्यास तुम्ही भरपूर बचत करू शकता.

तुम्ही पाहिलं असेल, की जवळपास सगळ्या एसींचं डीफॉल्ट टेम्परेचर हे 24 डिग्री सेल्सिअस असतं. 2020 सालापासून सरकारनेच याबाबत निर्देश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते हेच तापमान एसी वापरण्यासाठी सर्वात योग्य आहे. एसीचं तापमान तुम्ही किती ठेवत आहात त्यानुसार एसीवरील लोड बदलतो. याचाच परिणाम आपल्या बिलावर होतो.

एसीच्या तापमानात एक डिग्रीचा फरक झाला तर वीजेच्या वापरावर 6 टक्के परिणाम होतो. 24 डिग्री तापमानावरुन 23 डिग्री सेल्सिअस तापमान केलं, तरी वीजेचा 6 टक्के अधिक वापर होतो. कारण तापमान कमी करण्यासाठी एसीचा कंप्रेसर अधिक काम करतो. म्हणजेच, जास्त तापमानावर एसी वापरुन तुम्ही वीजेची बचत करू शकता.

मानवी शरीराचं तापमान हे साधारणपणे 36 ते 37 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. त्यामुळे 24 डिग्री सेल्सिअस तापमान हे आपल्याला थंड ठेवण्यासाठी पुरेसं आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. डॉक्टरांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *