मने जिंकली…मतेही जिंकणार !

Spread the love

रत्नागिरी : निवडणुकीचा प्रचार म्हटले की पदयात्रा, जाहिर सभा यांनी वातावरण ढवळुन निघते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातले अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी मात्र आपल्या प्रचारासाठी अत्यंत वेगळे तंत्र वापरत कोकणवासिय मतदारांची मने जिंकली आहेत. आता ते मोठया संख्येने मतेही जिंकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या कोकणात सुरू आहे.

शकील सावंत हे उद्योजक आहेत. राजकारणात येण्याबाबत ते सांगतात की, आजवर कोकणाने अनेक खासदार निवडुन दिले, मात्र काहीच प्रगती झाली नाही. मुलभुत सुविधांचे प्रश्न तसेच आहेत. मोठे प्रकल्प होत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात पर्यावरण पुरक प्रकल्प आणले जातात, परंतु कोकणावर मात्र विनाशकारी प्रकल्प लादले जातात. सर्वाधिक पाऊस पडुनही पाणी अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी चेक डॅम्स उभे न केल्यामुळे उन्हाळयात अनेक वाडया व मोहल्ल्यावर पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. गुणवत्तेत कायम कोकण पुढे असतानाही कोकणला स्वतंत्र विद्यापीठ नाही. सर्वात मोठी समस्या आरोग्याची आहे. आजही इमर्जन्सी सेवेसाठी गोवा आणि कोल्हापुरवर अवलंबुन राहावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीला उभा आहे, अशी भुमिका ते मांडतात.

रोजगाराची सर्वांत मोठी समस्या कोकणात आहे. परंतु त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी सर्वांत महत्वाचे पाऊल उचलले आहे. आपल्या सावंत पॅलेस या हॉटेलमध्ये त्यांनी स्थानिक युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
निवडणुकीचा प्रचार करताना त्यांचा सर्वाधिक भर हा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यावर आहे. त्यातही ते कारमधुन नव्हे तर एसटीने प्रवास करत वाडी, मोहल्ल्यापर्यंत पोहोचतात आणि लोकांशी संवाद साधतात. आपली भुमिका पटवुन देतात आणि आपणाला मत देण्याचे आवाहन करतात. त्यांच्या या अनोख्या प्रचाराला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असुन त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. आता ते मोठया प्रमाणावर मतेही जिंकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या कोकणात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *