5 आणि 6 एप्रिलला महाराष्ट्रातील ‘या’ दहा जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची हजेरी !

Spread the love

 डिजिटल डेस्क :   महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. खरेतर गेल्या मार्च महिन्याची सांगता अवकाळी पावसाने झाली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले.

गेल्या महिन्याच्या शेवटी राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. उत्तर महाराष्ट्रात देखील गेल्या महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस बरसला.

याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागातील कमाल तापमान 41 – 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काल राज्यातील वाशिम येथे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. वाशिम येथे काल 41.4 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.

दुसरीकडे राज्यातील इतरही अनेक भागांमध्ये कमाल तापमान 40°c पर्यंत पोहोचले. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मात्र 5 एप्रिलला आणि सहा एप्रिल ला राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता आहे.

या कालावधीत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आता आपण भारतीय हवामान खात्याचा अवकाळी पावसाबाबतचा हा अंदाज सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय म्हणतय भारतीय हवामान विभाग ?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचा अखेरीस पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता आहे. आय एम डी नुसार 5 एप्रिलला अर्थातच शुक्रवारी राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागातील धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

तसेच ६ एप्रिलला अर्थातच शनिवारी राज्यातील पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या 10 जिल्ह्यांमधील काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता तयार होत आहे.

यामुळे या सदर मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र, कोकण विभागातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. खरे तर गेल्या महिन्यात काही भागांमध्ये अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली होती. यामुळे गेल्या महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

अशातच आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे सत्र सुरु होणार आहे. पण, यासोबतच राज्यातील काही भागात उष्णतेची लाट सुद्धा येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याही गोष्टीची विशेष काळजी घ्यायाला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *