सोन्याला पुन्हा झळाळी, नोंदवला विक्रमी दर; लवकरच गाठणार 75 हजाराचा टप्पा

Spread the love

 डिजिटल डेस्क :  शेअर बाजारातील चढउताराचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत असतो. आता शेअर बाजारात चांगलीच तेजी आहे. शेअर बाजारात तेजी असताना सोन्याचे दर घसरतात. मात्र, बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असताना सोन्याचे दरात वाढ होते. मात्र, आता शेअर बाजारासह सोन्यालाही झळाळी मिळाली आहे. सध्या सोन्याने विक्रमी पातळी गाठली असून 10 ग्रॅमसाठी 71 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या तीन-चार दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात सोने 75 हजाराचा टप्पा गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

सोन्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आता उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरू होणार आहे. या काळात लग्नसराई असते. त्यामुळे या काळातच मोठ्या प्रमाणात सोने-चांदी आणि अलंकारांची खरेदी होत असते. मात्र, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने अनेकांनी सोने खरेदी टाळली आहे. सराफा बाजाराप्रमाणे वायदे बाजारातही सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत. सोन्या-चांदीला चांगले दर मिळत असल्याने सोन्या-चांदीत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. आगामी काळात लग्नसाईचा हंगाम असल्याने तसेच निवडणुकांचा काळ असल्याने सोन्याचे दर 75 हजाराचा टप्पा गाठतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *